चंद्राबाबू नायडू 'एनडीए'मधून पडणार बाहेर ?

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

नायडूंनी आंध्रप्रदेशला 'विशेष राज्याचा दर्जा' दिला जावा, अशी मागणी केली होती. नायडूंची ही मागणीही केंद्राने फेटाळली. त्यामुळे आता चंद्राबाबू नायडू यांचे पुढचे पाऊल 'एनडीए'मधून बाहेर पडणे हेच असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. 

हैदराबाद : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएमधून बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नायडूंकडून एनडीएतून बाहेर पडणार असल्याची घोषणा या आठवड्यात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chandrababu

2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशच्या विकासकामासाठी केंद्राकडून विशेष निधी दिला गेला नसल्याने मुख्यमंत्री नायडूंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यावर केंद्राने त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही. तसेच नायडूंनी आंध्रप्रदेशला 'विशेष राज्याचा दर्जा' दिला जावा, अशी मागणी केली होती. नायडूंची ही मागणीही केंद्राने फेटाळली. त्यामुळे आता चंद्राबाबू नायडू यांचे पुढचे पाऊल 'एनडीए'मधून बाहेर पडणे हेच असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. 

दरम्यान, टीडीपी एनडीएमधून बाहेर पडल्यास केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री अशोक गजपती राजू या दोघांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: Marathi News National News Political News TDP Chandrababu Naidu will exit from NDA