...ही तर मोदींच्या 'जनधन'मधील लूट ; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची टीका

National News Politics Rahul Gandhi Criticizes Narendra Modi And Government
National News Politics Rahul Gandhi Criticizes Narendra Modi And Government

नवी दिल्ली : "पंजाब नॅशनल बॅंके'नंतर आणखी एका ताज्या 390 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या निमित्ताने कॉंग्रेसने "मोदींच्या जनधन लूट योजनेतील हा आणखी एक गैरव्यवहार' असल्याची टीका सरकारवर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांमधील स्विफ्ट व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्‌विट करून सरकारवर शरसंधान साधले. "मोदीजींच्या जनधन लूट योजनेतील हा आणखी एक गैरव्यवहार आहे. दिल्लीतील सराफाने केलेल्या 390 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारातही नीरव मोदीप्रमाणेच "लेटर ऑफ अंडरटेकिंग' वापरण्यात आले. आता कदाचित मल्ल्या आणि नीरव मोदीप्रमाणेच हे महायशदेखील अदृश्‍य झाले असून, सरकार दुसरीकडे बघत राहिले आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणाले, की गैरव्यवहारामुळे बॅंकांच्या झालेल्या हानीचे आकडे वस्तुनिष्ठ असून, कथित "2-जी' स्पेक्‍ट्रम गैरव्यवहाराप्रमाणे हवेतले आकडे नाहीत. 

नीरव मोदीने "पंजाब नॅशनल बॅंके'ला चुना लावल्यामुळे आता रिझर्व्ह बॅंकेने स्विफ्ट व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे. बॅंकांमधील संपर्क यंत्रणा अद्ययावत आणि कोअर बॅंकिंग व्यवस्थेद्वारे जोडलेली असावी. आधीच देशाचे 21 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असताना आता पुन्हा 390 कोटी रुपयांच्या बॅंक गैरव्यवहाराची माहिती पुढे आली आहे. जगातील सर्वांत महागडे चौकीदार आपल्याच देशातले आहेत, अशी खिल्ली सिब्बल यांनी उडविली. 

महागडा लोकपाल 

पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये सरकारतर्फे "नॉमिनी' कोण होता, असा सवाल सिब्बल यांनी केला. या नॉमिनीने अलीकडेच अमृतसर येथे निवडणूक लढवल्याचा दावाही सिब्बल यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात सरकारने चौकशी करावी. तसे न झाल्यास कॉंग्रेस कायदेशीर कारवाई करेल. पंतप्रधानांनी 2014 पासून आतापर्यंत लोकपालाची नियुक्ती का केली नाही.

सर्वोच्च न्यायालय आता आदेश देत आहे. किमान आतातरी लोकपालाची नियुक्ती करा, असे आवाहन सिब्बल यांनी केले. बॅंकिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेत वृद्धी अशक्‍य असल्याचे निरीक्षण नोंदविताना सिब्बल यांनी जनतेचा पंतप्रधानांवरील विश्‍वास दिवसेंदिवस कमी होत असल्याचाही टोला लगावला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com