अमिताभ यांना श्रीदेवींच्या निधनाची कुणकुण ?

National News Sridevi Death hints to amitabh bachchan
National News Sridevi Death hints to amitabh bachchan

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, श्रीदेवी यांच्या निधनाची कुणकुण बिग बी अमिताभ बच्चन यांना लागली असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. कारण अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी ट्विटरवरुन भावना व्यक्त केल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी रात्री सव्वाएक वाजता ट्विट करुन 'न जाने क्यूँ, एक अजीब सी घबराहट हो रही है' अशी भावना व्यक्त केली होती. अमिताभ बच्चन यांनी असे ट्विट केल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. अमिताभ बच्चन यांना आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाणार, अशी भीती त्यांच्या मनात होती का ? नेमकी कसली भीती त्यांना वाटत होती ? की श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी बिग बींना समजली होती ? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

दुबईतील स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास श्रीदेवी यांचे निधन झाले असून, भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्रीचे एक वाजले होते. मात्र, त्यांच्या निधनाचे वृत्त दोन वाजल्यानंतर आले होते.

दरम्यान, इन्कलाब (1984) आणि आखिरी रास्ता (1986) या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी एकत्र भूमिका केली होती. तसेच 'खुदा गवाह' (1992) त्यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com