उमेदवारांनी कुटुंबाचे उत्पन्न जाहीर करण्याचा न्यायालयाचा आदेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

भ्रष्टाचारविरोधात लढणाऱ्या 'लोक प्रहारी' या सेवाभावी संस्थेने याबाबत एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

नवी दिल्ली : निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या मिळकतीबाबत सर्वोच्च न्यायालायाने आज (शुक्रवार) महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ''निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या संबंधित उमेदवाराने त्यांची पत्नी किंवा पती किंवा इतर कुटुंबीय सदस्यांच्या मिळकतीची माहिती द्यावी'', असे स्पष्ट केले आहे.

cash india

भ्रष्टाचारविरोधात लढणाऱ्या 'लोक प्रहारी' या सेवाभावी संस्थेने याबाबत एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सध्या कायद्यात अशी तरतूद आहे, की उमेदवाराने स्वत:ची, पती किंवा पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या अशा तिघांची माहिती फॉर्म 26 मध्ये देणे गरजेचे आहे. यासाठी नामनिर्देशन पत्रामध्येही याबाबतची माहिती विचारली जात असे. मात्र, यामध्ये मिळकतीच्या मार्गाची (सोर्स ऑफ इन्कम) माहिती दिली जात नाही. त्यामुळे लोकप्रहारी या संस्थेने संबंधित उमेदवारांच्या पत्नी किंवा पतीच्या माहिती जाहीर करावी, असे सांगितले आहे. त्यानुसार न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 

दरम्यान, न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे उमेदवारांच्या मिळकतीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

Web Title: Marathi News National News Supreme Court Election Candidate Source of Income