भाजप अन्‌ डाव्यांत "कॉंटे की टक्कर' ; त्रिपुरात आज मतदान, यंत्रणा सज्ज 

National News Tripura Election BJP And Left party
National News Tripura Election BJP And Left party

आगरतळा : त्रिपुरात उद्या (ता.18) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, येथे खरी लढत ही भाजप आणि डाव्या आघाडीमध्ये होणार आहे. मागील 25 वर्षांपासून या राज्यात डाव्यांची सत्ता आहे. विधानसभेच्या एकूण 60 पैकी 59 जागांसाठी मतदान होणार असून, एकट्या चारिलाम मतदारसंघामध्ये 12 मार्च रोजी मतदान होणार आहे.

माकपचे नेते रामेंद्र नारायणदेव बर्मा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. येथे राज्यातील 20 जागा अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आहेत. 

नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या प्रचारात सर्व पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. येथे 59 जागांसाठी 307 उमेदवार रिंगणात आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने 57 जागांवर आपले उमेवार उभे केले असून अन्य तीन जागा "आरएसपी', "फॉरवर्ड ब्लॉक' आणि "भाकप'साठी सोडण्यात आली आहे. हे सर्व डाव्या आघाडीचे घटकपक्ष आहेत.

भाजपने येथे "इंडिजिनिअस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा' (आयपीएफटी) सोबत आघाडी केली असून, या आघाडीचे 51 उमेवार रिंगणात उतरले आहेत. "आयपीएफटी'ने नऊ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्रिपुराची झुंज एकाकी लढणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने 59 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे गोमती जिल्ह्यातील काकराबन मतदारसंघासाठी पक्षाने एकही उमेदवार दिलेला नाही. 


राज्यातील मतदारराजा 

मतदार...25,73,413 
पुरुष मतदार...13,05,375 
महिला मतदार...12,68,027 
तृतीयपंथी मतदार....11 
नवे मतदार.....47,803 

महिलांकडे सूत्रे 

प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सकाळी 7 च्या सुमारास सुरू होणार असून, ती 4 वाजेपर्यंत चालेल. यासाठी 3 हजार 214 केंद्रांवर तयारी करण्यात आली आहे. 47 मतदान केंद्रांची सूत्रे महिला अधिकाऱ्यांकडे असतील. राज्य पोलिसांसमवेतच या भागामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या तीनशे तुकड्या तैनात केल्या जातील. या निवडणुकीची मतमोजणी 3 मार्च रोजी होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com