पाकिस्तानच्या गोळीबारात जवान मनदीप सिंग शहीद

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

जम्मू-काश्मीरातील काश्मीर घाटी सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरादरम्यान जवान मनदीप सिंग शहीद झाले. 

जम्मू : पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानच्या या गोळीबारात भारतीय लष्करातील जवान मनदीप सिंग यांना वीरमरण आले. 

जम्मू-काश्मीरातील काश्मीर घाटी सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरादरम्यान जवान मनदीप सिंग शहीद झाले. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या 35 चौक्यांना लक्ष्य केले होते. तसेच पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय लष्करातील जवान आणि नागरिकांना लक्ष्य केले जात होते. 

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तसेच पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

 

Web Title: Marathi News National Pakistan ceasefire jawan mandeep singh martyr