भाजपचा पराभव अटळ : हार्दिक पटेल

hardik patel
hardik patel

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज (गुरूवार) सकाळपासून सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासह पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने मतदानाचा हक्क बजावला आहे.

हार्दिक पटेलने गुजरातमधील जनतेला आवाहन करत आपली ताकद दाखवून द्यावी, असे सांगितले. ''अहंकारात मिरवणाऱ्यांच्या विरोधात मतदान करा. आपली ताकद काय आहे, हे आता जनता दाखवून देईल. या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार हे अटळ आहे'', असा विश्वासही हार्दिक पटेलने यावेळी व्यक्त केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हार्दिक पटेल आणि त्याचे वडिल भारत पटेल आणि आई उषा पटेल यांनी विरामगाममधून मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करा, विकासाच्या प्रवासासोबत रहा : अमित शहा

'राज्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि विकासाच्या प्रवासासोबत राहावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मतदारांना केले. त्यांनी पत्नी सोनल शहा आणि पुत्र जय शहा यांच्यासह नरानपुरा येथे मतदानाचा हक्क बजावला.  

गुजरातमध्ये परिवर्तनाची सुरवात : राहुल गांधी

''गुजरातमध्ये परिवर्तनाची सुरवात झाली असून, तुमचे एक मत लोकशाहीला सशक्त आणि भक्कम करणार आहे. गुजरातच्या जनतेला आवाहन करण्यात येते, की गुजरातच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्त संख्येने मतदान करावे'', असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. 

'विकास यात्रा' सुरु ठेवण्यासाठी मतदान करावे : अरुण जेटली

'विकास यात्रा' सुरु ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वेजलपूर येथून मतदानानंतर केले.

हे राम, गुजरातचे भले कर : हिराबेन 

'हे राम, गुजरातचे भले कर', असे उद्गागार पंतप्रधानांच्या मातोश्री हिराबेन यांनी मतदानानंतर काढले.

दरम्यान, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 93 जागांसाठी 851 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. राज्यातील 2.22 कोटी मतदारांपैकी 20 टक्के मतदारांनी सकाळी अकरावाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com