जिंकला विकास, जिंकले गुजरात : पंतप्रधान 

narendra modi
narendra modi

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून राज्यातील जनतेचे आभार मानले. ''जिंकला विकास, जिंकले गुजरात'', असे ट्विट त्यांनी केले.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठी आघाडी घेत काँग्रेसला मागे टाकले. या यशाबद्दल मोदींनी राज्यातील जनतेचे ट्विटरवरून आभार मानले. ते म्हणाले, '' विधानसभेचे हे निकाल म्हणजे गुजरातच्या जनतेने चांगले प्रशासन आणि विकासाला दिलेला पाठिंबा आहे. या यशाबद्दल मी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. त्यांच्या या विशेष अशा प्रयत्नांमुळे हे यश मिळवता आले आहे. राज्यातील जनतेलाही आम्ही सलाम करतो. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com