पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरण ; तिसऱ्या प्रकरणातही लालू दोषी

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जानेवारी 2018

बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची पशूखाद्य गैरव्यवहाराच्या दुसऱ्या प्रकरणात न्यायालयाने डिसेंबरमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्यांची तिसऱ्या प्रकरणात चैबसा खजिन्यातून निधीचा घोटाळा केल्याचा आरोपावरून न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे. 

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी तिसऱ्या प्रकरणातही दोषी आढळले आहेत. रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. प्रसाद यांनी याबाबत निकाल दिला.

1992-93 मध्ये चैबसातील खजिन्यातून सुमारे 33 कोटी 67 लाख रूपये काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणाची सुनावणी न्या. प्रसाद यांच्यासमोर होणार होती. तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची पशूखाद्य गैरव्यवहाराच्या दुसऱ्या प्रकरणात न्यायालयाने डिसेंबरमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्यांची तिसऱ्या प्रकरणात चैबसा खजिन्यातून निधीचा घोटाळा केल्याचा आरोपावरून न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे. मात्र, मिश्रा यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने 56 पैकी 50 आरोपींना दोषी ठरवले.  

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांना पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लालू हे सध्या तुरुंगात असून, तेथे ते माळीकाम करत असल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: Marathi news National Politics Lalu Prasad Yadav found guilty in third fodder scam case