पंतप्रधानांची आयएसआयला पठाणकोटसाठी परवानगी होती : लालूप्रसाद यादव

Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानमधील कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयला पठाणकोट हवाईतळावर फिरण्यासाठी परवानगी दिल्याची घणाघाती टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली.

काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या टीकेवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधत आहेत. मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले असून, काँग्रेसचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचे मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा लालूप्रसाद यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मोदींनी पाकिस्तानातील कुख्यात दहतवादी संघटना आयएसआयला संवेदनशील अशा पठाणकोटच्या हवाईतळावर फिरण्यासाठी परवानगी दिली होती.

मोदींनी काँग्रेसवर 'पाकिस्तान प्रेम' म्हणून टीका केली होती. मात्र, मोदींनी आमंत्रण नसलेल्या कार्यक्रमाला पाकिस्तानात जाऊन उपस्थित लावली होती. याशिवाय मोदींनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रण दिले होते. तसेच त्यांना भेटही दिली होती. मात्र, तरीही पाकिस्तान बदललेला नाही, असेही लालूप्रसाद म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com