प्रद्युम्न हत्याप्रकरण ; बस कंडक्टर अशोककुमारला जामीन मंजूर

pradyuman
pradyuman

गुडगाव : प्रद्युम्न ठाकूर या आठ वर्षीय बालकाच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हत्येप्रकरणातील अकरावीत शिकणाऱ्या खऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर संशयित आरोपी बस कंडक्टर अशोककुमारने जामीनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायायलाने अखेर अशोककुमारला जामीन मंजूर केला आहे. 

हरियानातील गुडगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात प्रद्युम्न ठाकूर या बालकाचा मृतदेह 8 सप्टेंबरला आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपावरून शाळेच्या बस कंडक्टरला अटक केली होती. मात्र, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काही दिवसांपूर्वी याप्रकरणातील खऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर अशोककुमार याने वकील मोहित वर्मा यांच्यामार्फत जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपी बस कंडक्टरला जामीन मंजूर केला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी यादव यांनी सीबीआय आणि अशोककुमार यांच्या वकीलांची बाजू ऐकल्यानंतर अशोककुमारला जामीन मंजूर केला.  

दरम्यान, अशोककुमारविरोधात कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे सीबीआयने यापूर्वीच म्हटले होते. त्यानंतर आम्ही त्याच्या जामीनासाठी याचिका दाखल केल्याचे वर्मा यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com