एसबीआयच्या 1300 शाखांची नावे आणि आयएफएससी कोडमध्ये बदल

SBI
SBI

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) देशातील विविध भागातील सुमारे 1300 शाखांची नावे आणि आयएफएससी कोडमध्ये बदल केला आहे. चालू वर्षात मुख्य स्टेट बॅंकेमध्ये सहयोगी स्टेट बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे एसबीआयने शाखांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

सहयोगी स्टेट बँकांच्या काही शाखांचे आता मुख्य स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. परिणामी बँकांच्या आयएफएससी कोडमध्ये देखील बदल करण्यात आला आहे, असे स्टेट बँकेचे प्रबंध निदेशक (डिजिटल बँकिंग) प्रवीण गुप्ता यांनी सांगितले. यामध्ये मुख्यत: मुंबई, दिल्ली, बेंगळूरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊ या शहरांमधील बहुतांश बँकेच्या शाखांच्या नावात बदल करण्यात आले आहेत.

ज्या स्टेट बॅंकेच्या शाखांमध्ये बदल करण्यात आले त्या शाखेतील ग्राहकांना कोड बदलल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय अंतर्गत व्यवहारांसाठी देखील बँकांना नव्या कोडसोबत जोडण्यात आले आहे. त्यामुळे जर कोणी जुना आयएफएससी कोड वापरुन व्यवहार केला तर तो नव्या कोडमध्ये समाविष्ट होणार आहे, असेही गुप्ता म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com