राहुल गांधींच्या टीकेनंतर मोदींचा 'भ्रष्टाचार' समोर

PM MODI
PM MODI

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचारावर काहीच बोलत नाहीत, अशी टीका केली. त्यानंतर मोदींनी आज त्यांच्या भाषणात भ्रष्टाचारावर उघडपणे भाष्य केले. ''आम्ही भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी सरकारी यंत्रणेत सुधारणा करणार आहोत'', असे ते म्हणाले.  

दिल्ली येथे आयोजित 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'च्या 90 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पंतप्रधान बोलत होते. राहुल गांधींनी काल (मंगळवार) पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. राहुल गांधी म्हणाले, की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांचे भ्रष्टाचारप्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी गप्प का आहेत. पंतप्रधान मोदी सत्तेवर येण्यापूर्वी भ्रष्टाचारावर खूप बोलत होते. मात्र, आता सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचारावर उघडपणे का बोलत नाहीत, असा सवाल राहुल गांधींनी केला होता. 

यावर मोदी म्हणाले, देशातील गरीब जनता मूलभूत गरजांसाठी लढत आहे. सेवानिवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कमिशन द्यावे लागत आहे. या सर्व भ्रष्टाचाराचा आम्ही नायनाट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच देशातील गरीब जनतेसाठी केंद्र सरकारकडून जनधन योजना आणण्यात आली आहे. आम्ही या गरीब जनतेला समाधान देणार आहेत. त्यांना जनधन खाते उघडण्यासाठी जो त्रास सहन करावा लागला, अशा सर्व लोकांसाठी शून्य रुपयात जनधन योजना सुरु केली गेली.  

यावेळी त्यांनी यूपीए सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात झालेला 'नॉन परफॉर्मिंग असेटस्' हा कॉमनवेल्थ, 2जी, कोळसा घोटाळ्यापेक्षा सर्वात मोठा घोटाळा आहे. जे लोक यापूर्वी गप्प होते त्यांनी आता यावर बोलले पाहिजे.

एफआरडीआयबाबत अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र, सरकार ठेवीदारांचे व्याज आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करत आहे. काही अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही, असेही ते म्हणाले.

70 वर्षांची जुनी यंत्रणा बदलणार : पंतप्रधान

देशातील यंत्रणेला लढा देण्यासाठी आम्ही पारदर्शी नाही तर संवेदनशील आणि लोकांच्या गरजा समजवून घेणारी व्यवस्था निर्माण करत आहोत.

देशातील लोकांना फायदा व्हावा, यासाठी संपूर्ण यंत्रणा मजबूत आणि पारदर्शी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच आम्ही 70 वर्षे जुनी यंत्रणा बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी शक्ती आणि हिमतीची गरज आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com