उत्तर प्रदेशमध्ये बुरखा काढण्यासाठी महिलेवर पोलिसांनी दडपण आणले

burkha
burkha

बालिया : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीपूर्वी महिलेला बुरखा काढण्यास दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. 

मुख्यमंत्री आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुसाठी बैठक घेणार होते. त्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार होते. तसेच त्यानंतर रॅलीही काढण्यात येणार होती. यादरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलने सायरा या महिलेला तिने परिधान केलेला काळा बुरखा काढण्यास सांगितले होते. 

इस्लामिक परंपरेनुसार महिला असा बुरखा परिधान करतात, असे तिने महिला कॉन्स्टेबलला सांगितले होते. तसेच मी भाजप कार्यकर्ती आहे. आमचा पारंपारिक ड्रेस परिधान करुन मी या रॅलीसाठी येथे आले आहे. 

याबाबत जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र विक्रम यांनी सांगितले, ''शहर दंडाधिकाऱ्यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले असून, यातील दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच पोलिसांनाही याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत''.

''या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ चित्रीकरण मिळाले असून, याप्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. तसेच शहर पोलिस उपअधीक्षकांनाही सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या रॅलीदरम्यान त्यांना कोणीही काळे झेंडे दाखवू नयेत, याची आम्ही खबरदारी घेतली होती'', असे पोलिस अधीक्षक अनिलकुमार म्हणाले. 

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी मिरुत येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक रॅलीला गेले असता त्यांना तेथे काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर आता हा प्रकार घडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com