भाजप कार्यकर्त्यांकडून टोल कर्मचारी महिलेचा विनयभंग

molestation
molestation

गुडगाव : गुडगावमधील खेरकी डौला टोल नाक्यावर टोल कर्मचारी महिलेचा विनयभंग करण्यात आला. टोल कर्मचारी महिलेने संबंधित वाहनचालकाला टोलचे पैसे मागितल्याने हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. विनयभंग करणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे.

"आम्ही सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते आहोत. टोलचे बॅरीअर उघडा असे म्हणत कार्यकर्त्यांकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्या कर्मचारी महिलेने त्यांचे न ऐकता टोलच्या पैशांची मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या एसयूव्ही वाहनातून उतरून त्या महिलेची छेडछाड करत तिचा विनयभंग केला. तसेच टोल केबिनची तोडफोडही केली'', अशी माहिती खेरकी डौला टोला नाक्याचे जनसंपर्क अधिकारी कृपालसिंह यांनी वृत्तसंस्थेला दिली.

"या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कैद झाले असून, त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच आम्ही यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सध्या यातील आरोपींची चौकशी सुरु करण्यात आली आहे", अशी माहिती गुडगाव पोलिस जनसंपर्क अधिकारी रविंद्र कुमार यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com