काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांना पंतप्रधानांची श्रद्धांजली

priya-ranjan-dasmunshi
priya-ranjan-dasmunshi

नवी दिल्ली (युएनआय): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियरंजन दासमुन्शी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हणले
आहे की, 'प्रियरंजन दासमुन्शी हे लोकप्रिय नेते होते, त्याचबरोबर त्यांना मोठा राजकीय व प्रशासकीय अनुभव होता. त्यांनी भारतात फुटबॉल लोकप्रिय करण्यासाठी खूप
काम केले. दिपा दासमुन्शीजी, त्यांचे कुटुंबिय व समर्थक यांच्या दु:खात मी सहभागी आहे.' 

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या संसदीय कामकाजाचे मंत्री असताना दासमुन्शी यांना 2008 मध्ये अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यांना बोलणे अशक्य झाले. 1985 मध्ये त्यांनी प्रथम केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. जवळपास 20 वर्षांपासून दासमुन्शी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष होते. 

काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी हे 2008 सालापासून कोमात होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दिपा दासमुन्शी आणि पुत्र प्रियदीप दासमुन्शी असा
परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com