त्यांनी प्रद्युम्नला गमावलं पण माझ्या मुलाला वाचवलं...

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

"प्रद्युम्नच्या वडिलांनी त्यांचा मुलगा गमवला असला तरी त्यांनी माझा मुलगा वाचवला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मी कायम त्यांचे ऋणी राहीन".
- केला देवी (बस कंडक्‍टर अशोक कुमारची आई )

गुरुग्राम: बरुन ठाकूर यांनी स्वत:चा मुलगा प्रद्युम्न गमावला पण माझ्या मुलाला वाचवलं, त्यांनी माझ्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया 'रायन इंटरनॅशनल स्कुल'चा बस कंडक्‍टर अशोककुमारची आई केला देवी यांनी दिली.  

'रायन इंटरनॅशनल स्कुल'च्या प्रद्युम्न ठाकूर या आठ वर्षीय बालकाचा काही दिवसांपूर्वी खून करण्यात आला होता. त्याच दिवशी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी शाळेचा बस कंडक्‍टर अशोककुमार यास ताब्यात घेतले होते. मात्र, अकरावीत शिकणाऱ्या खऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रद्युम्नच्या वडिलांनी अशोककुमारला तुरुंगातून सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अशोककुमारची आई म्हणाली, "प्रद्युम्नच्या वडिलांनी त्यांचा मुलगा गमवला असला तरी त्यांनी माझा मुलगा वाचवला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मी कायम त्यांचे ऋणी राहीन".

 

टॅग्स