हॉस्पिटल्समध्ये ठरवून तुमचा खिसा कापला जातोय : एनपीपीए 

representational image
representational image

नवी दिल्ली : कोणत्याही कारणामुळे तुम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये भरती झालात, तर तुमच्या तेथील वास्तव्याच्या कालावधीत होणाऱ्या चाचण्या, औषधे यांच्या बिलातून हॉस्पिटलला १,७०० टक्क्यांपर्यंत फायदा होत असतो. हा निष्कर्ष तुम्ही-आम्ही नव्हे, तर नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऍथॉरिटीने (एनपीपीए) दिल्लीतील चार प्रतिष्ठित हॉस्पिटलच्या बिलांचा सखोल अभ्यास करून काढला आहे. 

रुग्णासाठीची औषधे, उपकरणे आणि डिस्पोझेबल्स हॉस्पिटलमधील औषधांच्या दुकानातूनच घेण्याची सक्ती करण्यात आली होती, असेही या अभ्यासातून 'एनपीपीए'च्या समोर आले आहे. तसेच, औषधांचा 'एमआरपी' वाढीव दराने छापण्यासाठी मोठी हॉस्पिटल्स औषध निर्मिती कंपन्यांवर दडपण आणतात, असेही 'एनपीपीए'चे निरीक्षण आहे. यामुळे रुग्णांच्या खिशावर अधिक ताण येतो, असेही यात नमूद करण्यात आले आहे. 

दिल्लीमध्ये डेंग्यू आणि इतर काही कारणांमुळे निधन झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी या हॉस्पिटल्सवर लूट केल्याचा आरोप केला होता. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी झाल्याने 'एनपीपीए'ने हा अभ्यास केला. कन्झ्युमेबल्सवरील हॉस्पिटलचा फायदा तब्बल 350% ते 1,700% इतका आहे. सरकारच्या नियंत्रक कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या औषधांच्या बाबतीतील हा फायदा 160% ते 1,200% इतका आहे. या नियंत्रक कायद्याच्या कक्षेत असलेल्या औषधांमधील फायदा 115% ते 360% टक्के आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com