काँग्रेस सत्तेत येताच GST बदलून दिलासा देऊ- राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराच्या केवळ मोजक्याच मुद्द्यांवर बोलतात असा टोला राहुल यांनी लगावला. भाजपने आश्वासने दिलेल्या कामांचं काय झालं हेही सांगावं अशी मागणी त्यांनी केली.

नहान- केंद्रामध्ये 2019 मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) आमूलाग्र बदल करून ग्राहक, विक्रेते आणि इतर क्षेत्रांना दिलासा देऊ, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) सांगितले. 

काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशात सर्रास भ्रष्टाचार होत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावर राहुल यांनी मोदींना प्रत्युत्तर देताना सांगितले की, "नीती आयोगाच्या अहवालानुसार येथे इतर राज्यांपेक्षा भ्रष्टाचाराची पातळी कमी होती. डोंगराळ भाग असलेल्या हिमाचलने गुजरातपेक्षा खूप चांगली प्रगती केली आहे. हिमाचलमध्ये असलेली विकासाची पातळी भाजपशासित गुजरात पेक्षा फार उत्तम आहे. 

पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराच्या केवळ मोजक्याच मुद्द्यांवर बोलतात असा टोला राहुल यांनी लगावला. भाजपने आश्वासने दिलेल्या कामांचं काय झालं हेही सांगावं अशी मागणी त्यांनी केली. "जीएसटीमुळे त्रास व नुकसान सहन करावं लागणाऱ्या लोकांसाठी 2019 मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आम्ही जीएसटीत संपूर्णपणे बदल घडवून आणू", असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. राहुल यांनी पावंता साहिब, चंबा आणि नागरोता येथे निवडणूक प्रचारसभा घेतल्या. 

जीएसटी पारित करण्याच्या प्रक्रीयेत काँग्रेसनेही पाठींबा दिला होता असा दावा भाजप नेत्यांनी केला होता. त्याला उत्तर देत राहुल गांधी म्हणाले, "जो कर अंमलात आणला गेला तो पारित केलेल्या प्रस्तावाप्रमाणे नाही. सरकारने जीएसटीत 28 टक्के इतका जास्त कर लावला आहे. शिवाय, प्राप्तिकर भरण्याची प्रक्रियाही फार गुंतागुंतीची केली आहे. त्यामुळे व्यवसायांवर त्याचे दुष्परिणाम झाले आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

फोटो गॅलरी