न्या. लोया प्रकरणात सुप्रिम कोर्टात एकत्रित सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

सीबीआय न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या कथित संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्ट आणि नागपूर खंडपीठाकडे दाखल केलेल्या दोन याचिका परत मागवल्या आहेत. बी. एच. लोया यांचे मृत्युप्रकरणी 2014 मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. 

सीबीआय न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या कथित संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्ट आणि नागपूर खंडपीठाकडे दाखल केलेल्या दोन याचिका परत मागवल्या आहेत. बी. एच. लोया यांचे मृत्युप्रकरणी 2014 मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. 

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती जे. चेलामेश्वर, रंजन गोगोई, एम. बी. लोकुर आणि कुरिअन जोसेफ हे चार न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणी नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात याचिकाकर्त्यांचे वकील व सरकारी वकील यांच्यात आपापल्या पक्षाची बाजू मांडतांना वादावादी झाली. यावेळी राज्य सरकारने नेमलेले वकील हरीश साळवे यांच्या नियुक्तीवर याचिकाकर्त्यांचे वकील दुष्यंत दवे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सुनावणी दरम्यान वातावरण चांगलेच तापले. आता या प्रकरणाची सुनावणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. 

गुजरातधील सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी बी. एच. लोया हे मुख्य न्यायाधीश होते. 2014 मध्ये नागपूरात त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूकडे संशयास्पद नजरेने बघितले जात आहे. कारण सोहराबुद्दीन प्रकरणात सध्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह गुंतले होते. परंतु डिसेंबरमध्ये त्याच वर्षी त्यांना न्यायालयाने मुक्त केले होते. लोया यांच्या मृत्यूनंतर सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. याप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चार न्यायाधीशांच्या खंडपीठाने आणि पोलिस महासंचालक यांनी हा मृत्यू ह्रद्यविकाराच्या झटक्यानेच झाला असल्याचे सुप्रीम कोर्टात म्हटले आहे.    
 

Web Title: marathi news Supreme court transferred to itself two petitions in loya case