दहशतवाद्यांकडून पोलिसाची हत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी आज केलेल्या हल्ल्यात एक पोलिस कॉन्स्टेबल हुतात्मा झाला. दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ही घटना घडली. शाबीर अहमद दर असे हुतात्मा झालेल्या पोलिसाचे नाव असून त्याच्या घराबाहेरच दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. कालच (ता. 14) लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने पोलिसांना नोकरी सोडून देण्याची धमकी दिली होती.