हुतात्मा दर्जा निमलष्करी दलालाही लागू

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

हंसराज अहीर यांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली-  दंगल, निदर्शने अशा प्रकारची कोणतीही बिकट परिस्थिती हाताळताना निमलष्करी दलातील एखाद्या जवानाला मृत्यू आल्यास त्याला "हुतात्मा' असे घोषित केले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली.

हंसराज अहीर यांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली-  दंगल, निदर्शने अशा प्रकारची कोणतीही बिकट परिस्थिती हाताळताना निमलष्करी दलातील एखाद्या जवानाला मृत्यू आल्यास त्याला "हुतात्मा' असे घोषित केले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली.

गेल्या चार वर्षांत विविध ठिकाणी निदर्शने व दंगलीसारख्या घटना घडल्या. यात एकूण 3436 जवान जखमी झाले आहेत, तर 2013-15 या काळात अशा घटनांमध्ये 12 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, 4780 कर्मचारी जखमी झाल्याचे अहीर यांनी सांगितले. विविध ठिकाणी तैनात असलेल्या जवानांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक शस्त्रे देण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षेस सरकारचा प्राधान्यक्रम राहील, असेही अहीर म्हणाले. देशातील महत्त्वाची विमानतळे दहशतवाद्यांच्या रडारावर असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली असून, या पार्श्वभूमीवर संभाव्य हल्ले रोखता यावेत, यासाठी गृह मंत्रालयाकडून विमानतळांवरील सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचेही किरण रिजिजू यांनी सांगितले.

बिहारमधील खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्या अटकेचा मुद्दा त्यांच्या पत्नी रंजित रंजन यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. बिहार पोलिसांनी खासदाराला असलेल्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्याप्रकारे पोलिसांनी कारवाई केली, ही बाब गंभीर आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हे चुकीचे आहे का, अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

25 हजार संस्थांना परदेशातून निधी
देशातील सुमारे 25 हजार स्वयंसेवी संस्थांना परदेशातून निधी मिळत असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यामध्ये अनेक शाळा व मदरशांचाही समावेश असल्याचे गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले. मुस्लिम धर्म प्रचारक झाकीर नाईक यांची संस्था, इस्लाम रिसर्च फाउंडेशन या संस्थांवर मागेच बंदी घालण्यात आली असून, सध्या तरी "एफसीआरए'अंतर्गत नोंद झालेली कोणतीही संस्था परदेशातून मिळणाऱ्या पैशाचा वापर दहशतवाद अथवा अन्य कारणासाठी करत असल्याचे आढळून आले नाही, असेही रिजिजू यांनी स्पष्ट केले.