दिल्लीत खासगी कारमध्ये विनामास्क प्रवासाला परवानगी; केजरीवाल सरकारचा निर्णय

सर्व प्रकारचे कोविडचे निर्बंध केजरीवाल सरकारकडून हटवण्यात आले आहेत.
Mask in Car
Mask in Car

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आता सर्व प्रकारचे कोविडचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. कोरोनाच्या संसर्गाची स्थिती आता सामान्य झाल्यानं केजरीवाल सरकारकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पण मास्क वापरण आणि कोविडसंबंधीच्या योग्य वागणुकीचं पालन करणं अनिवार्य असल्याचं आदेशात म्हटलं आहे. त्याचबरोबर खासगी कारमध्ये मास्क बंधनकारक नसल्याचंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. (Masks are no longer mandatory in private cars in Delhi Kejriwal govt decision)

राष्ट्रीय राजधानीत आता खासगी कारमधील लोकांसाठी मास्क लावणं बंधनकारक नसलं तरी सार्वजनिक वाहनं जसं की बसेस, कॅब किंवा टॅक्सींमधून प्रवास करताना मात्र मास्कसह इतर सर्व कोविडच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी हा नवा आदेश आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com