नरोदा पाटिया हत्याकांडप्रकरण ; माया कोडनानी निर्दोष

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नरोदा पाटिया हत्याकांडप्रकरणी विशेष न्यायालयाने भाजप आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवले होते. 28 फेब्रुवारी 2002 मध्ये अहमदबादमधील नरोदा पाटिया भागात सर्वात मोठी दंगल निर्माण झाली होती.

अहमदाबाद : 2002 मधील बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली. तर बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयाकडून माया कोडनानी यांची 28 वर्षांची शिक्षा रद्द करण्यात आली असून, बाबू बजरंगीसह हरेश छारा, सुरेश लंगडा यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे.

Gujarat high court

नरोदा पाटिया हत्याकांडप्रकरणी विशेष न्यायालयाने भाजप आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवले होते. 28 फेब्रुवारी 2002 मध्ये अहमदबादमधील नरोदा पाटिया भागात सर्वात मोठी दंगल निर्माण झाली होती. तसेच 27 फेब्रुवारी 2002 मध्ये गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसचे काही डबे जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती. गोध्रा हत्याकांडानंतर निर्माण झालेल्या या दंगलीत नरोदा पाटिया येथे 97 लोकांची हत्या करण्यात आली होती. तसेच यामध्ये 33 लोक जखमी झाले होते.

दरम्यान, याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने आज सुनावणी घेतली. यामध्ये कोडनानी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, त्यांना सुनावण्यात आलेली 28 वर्षांची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. दंगल उसळली त्यावेळी माया कोडनानी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या.

Web Title: Maya Kodnani acquitted Bajrangi conviction upheld in Naroda Patiya riots Babu Bajrangi involved