जमीन गैरव्यवहारप्रकरणी मायावती यांना नोटीस

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

अलाहाबाद: उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक वातावरण तापलेले असताना बसप नेत्या मायावती यांना आज जोरदार झटका बसला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका जमिनीच्या फेरफार प्रकरणात मायावतीसह त्यांचे वडील प्रभुदयाळ आणि भाऊ आनंदकुमार यांना नोटीस बजावली. बदलापूर गावातील जमीन फेरफारप्रकरणी ही नोटीस आहे.

याचिकाकर्ते संदीप भाटी यांनी नोईडाच्या बदलापूर गावातील लॅंड यूज बदलण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

2006 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी बादलपूर गावातील शेतजमीन एनए दाखविली होती. त्यासाठी कागदपत्रात फेरफार करण्यात आले होते. या गैरव्यवहारातून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मायावती यांचे बंधू आनंदकुमार यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी प्राप्तिकर खात्याने नोटीस बजावली आहे.

देश

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या कार्यालयासाठी राजधानीतील मध्यवर्ती भागात बंगला देण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश नायब राज्यपालांनी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017