लग्नपत्रिकेतून 'स्वच्छ भारत'चा प्रचार

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचे पालन माझे वडील पूर्वीपासून करीत आहेत. जेव्हा माझ्या बहिणीचा विवाह ठरला तेव्हा काहीतरी वेगळे करायचे असे त्यांच्या मनात होते. मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी लग्नपत्रिका वापर करण्याचे त्यांनी ठरविले. 
- आकाश जैन, व्यावसायिक, बंगळूर

बंगळूर - आपली मोठी स्वप्न पाहतो, ती कधी पूर्ण होतील हे कोणीही सांगू शकत नाही. पण बंगळूरमधील युवा व्यावसायिक आकाश जैन याने स्वप्नातही न पाहिलेली गोष्ट घडून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्‌विटर फॉलोअरच्या यादीत आकाशला स्थान मिळाले आहे. पंतप्रधानांची ही यादी केवळ सतराशे जणांची नावे आहे. त्यात आता आकाशची भर पडली आहे. 

ही आश्‍चर्यकारक व अभिमानाची गोष्ट घडून येणास आकाशच्या कुटुंबाने सामाजिक जाणीवेतून प्रचाराचे उचलले पाऊल ठरले आहे. आकाशच्या बहिणीच्या विवाहासाठी छापलेल्या लग्नपत्रिकांवर "स्वच्छ भारत'चे चिन्ह छापून त्याद्वारे समाजजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आकाशने त्याच्या ट्विटर हॅंडलवर ही अभिनव लग्नपत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केली. आकाशच्या पोस्टनंतर भाजपच्या अनेक नेत्यांना रिट्विट करून त्याच्या कल्पकतेचे कौतुक केले. पण मोदी यांनी स्वतः त्याच्या पोस्टवर रिट्‌विट केले आणि त्याला "फॉलो' केले तेव्हा तर आकाशला गगनच ठेंगणे झाल्यासारखे वाटू लागले. 

"आपल्या उपक्रमाचे संसद सदस्यांकडून कौतुक होणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. याबद्दल सर्वांचे आभार. असे काही प्रत्यक्षात घडेल असे कधी वाटले नव्हते. पण ट्‌विट्‌स खरे आहेत. मोदीजी यांनी "फॉलो' करून माझा सन्मानच केला आहे, असे ट्‌विट आकाशने नंतर केले. ""पंतप्रधानांना टॅग करून लग्नपत्रिकेचे छायाचित्र आपण सर्वांसाठी "शेअर' केले होते. यावर खुद्द मोदी यांच्याकडून प्रतिसाद मिळेल आणि ते मला "फॉलो' करतील अशी अपेक्षा बिलकुल नव्हती. ज्यांचे सर्वाधिक "फॉलोअर' आहेत, ते मला "फॉलो' करतात यापेक्षा मोठे काय असू शकते?,' अशी भावना आकाशने व्यक्त केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचे पालन माझे वडील पूर्वीपासून करीत आहेत. जेव्हा माझ्या बहिणीचा विवाह ठरला तेव्हा काहीतरी वेगळे करायचे असे त्यांच्या मनात होते. मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी लग्नपत्रिका वापर करण्याचे त्यांनी ठरविले. 
- आकाश जैन, व्यावसायिक, बंगळूर