भारतात स्त्री-पुरुष भेदाला स्थान नाही - राष्ट्रपती

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

नवी दिल्ली: सर्वसमावेशक विकास हेच उद्दिष्ट असलेल्या आधुनिक भारतात स्त्री-पुरुष भेदाला काहीही स्थान नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी केले. महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा उल्लेख करत ते म्हणाले की, भारतातील महिलांना सुरक्षित वाटत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्ती पुरस्कारांचे वितरण आज राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाले. त्या वेळी मुखर्जी बोलत होते. "महिलांवरील वाढत्या हिंसाचाराबाबत सरकारलाही चिंता वाटत आहे,' असे त्यांनी सांगितले. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी या वेळी उपस्थित होत्या.
एकूण 31 महिलांना या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यामध्ये सुभा वरियर, बी. कोंडायांगू. अनट्टा सोनी या "इस्त्रो'च्या शास्त्रज्ञ, कथकली नृत्यप्रकार सादर करणारे केरळमधील महिला कलाकारांचे पहिले पथक, भारतातील पहिल्या चित्रलेखिका अमृता पाटील, आशियातील पहिली महिला रेल्वेचालक मुमताझ काझी, मानवी तस्करीतून सुटका झालेली न बालकामगारांसाठी काम करणाऱ्या अनोयारा खातून, तसेच महिला पर्यावरणतज्ज्ञ व प्राणीमित्र आदी विविध क्षेत्रांतील महिलांचा समावेश होता. एक लाख रुपये व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.