#MeToo: रणतुंगाने माझी कंबर पकडली अन्...

#meToo Indian flight attendant claims Arjuna Ranatunga sexually harassed her
#meToo Indian flight attendant claims Arjuna Ranatunga sexually harassed her

नवी दिल्लीः बॉलिवूडमधून सुरू झालेले MeToo चे वादळ विविध क्षेत्रांमध्ये घोंघावू लागले आहे. दररोज #MeToo च्या माध्यमातून नवनवी प्रकरणे उघड होऊ लागली आहेत.

#MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आज एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भारतात हवाई क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगावर लैंगिकसुखासाठी छळ केल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. अर्जुन रणतुंगा सध्याच्या श्रीलंकेतील सरकारमध्ये पेट्रोलियम खात्याचा मंत्री आहे.

श्रीलंकेचा संघ काही वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर असताना मुंबईतील हॉटेलमध्ये ही घटना घडली होती, असा दावा संबंधित महिलेने केला आहे. या महिलेने फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहली आहे. रणतुंगाबरोबरच अन्य लोकांनी लैंगिक सुखासाठी कसा त्रास दिला त्याची माहिती सुद्धा तिने लिहीली आहे. अर्जुण रणतुंगाने माझी कंबर पकडल्यानंतर मी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली व त्या खोलीमधून बाहेर पडले. मी पळत स्वागतकक्षाजवळ आले व घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. त्यावेळी हॉटेल मधील व्यवस्थापनाने ती तुमची खासगी बाब आहे असे सांगून हात वर केले.

फेसबुकवर सविस्तर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माझ्याबाबत घडलेली घटना ही 1998 मधील आहे. श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी जुहूच्या सेंटॉर हॉटेलमधल्या लिफ्टमधून जाणाऱ्या भारतीय आणि श्रीलंकन क्रिकेटपटूंवर माझ्या सहकाऱ्याचे लक्ष गेले. त्यावेळी त्यांची सही घेण्यासाठी त्यांच्या रुममध्ये आम्ही गेलो. रुममध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला दारु पिण्याची ऑफर केली. मात्र, ती नाकारली. मी पाण्याची बाटली सोबत आणली होती. त्या रुममध्ये ते सात जण तर आम्ही दोघी होतो. त्यांनी दरवाजा बंद केल्यानंतर माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली व मला भिती वाटू लागली. आपण आपल्या रुममध्ये परत जाऊया, असे मी माझ्या मैत्रिणीला सांगितले. पण ती त्या क्रिकेटपटूंच्या प्रेमामध्ये हरवून गेली होती. तिला स्विमिंग पूलच्या बाजूला फेरफटका मारण्यासाठी जायचे होते. त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. पूलकडे कोणीही नव्हते. भारतीय क्रिकेटपटूही दिसत नव्हते. त्यावेळी रणतुंगाने मागून माझी कंबर पकडली. त्याचे हात माझ्या छातीपर्यंत पोहोचले होते. मी आरडा-ओरडा सुरु केला, त्याच्या पायावर लाथा मारत होते. तुझा पासपोर्ट रद्द होईल, पोलिसांकडे जाईन, तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी त्याला धमकी देत होते. मी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली व पळत स्वागत कक्षाजवळ आले व घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. रिरेप्शनीशने ती तुमची खासगी बाब आहे, असे सांगून हात झटकले. मला मदत केली नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com