लपलेल्या दहशतवाद्याचा भारतीय सैन्याने केला खात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

श्रीनगर : काश्मीरमधील सोपोर भागामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये आज (मंगळवार) पहाटे चकमक झाली असून, यामध्ये भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. 

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथील हरितार तारझू परिसरात दोन दहशतवादी लपून बसले असल्याची खबर भारतीय सैन्याला मिळाली. त्यावरून जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली. शोध सुरू करताच दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार करण्यास सुरवात केली. त्याला भारतीय फौजेने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये एक दहशतवादी मारण्यात त्यांना यश आले. 

दरम्यान, शोध मोहीम आणि चकमक अद्याप सुरू असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. मारलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सैन्याने जप्त केला आहे.
 
Web Title: Militant killed in encounter in Kashmir’s Baramulla district