बलात्कारास विरोध केल्याने फोडला डोळा

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

भागलपूर (बिहार)- बलात्कारास विरोध केल्यामुळे एका युवकाने तिच्या डोळ्यात खिळा घालून फोडल्याची घटना येथे घडली असून, युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

भागलपूर (बिहार)- बलात्कारास विरोध केल्यामुळे एका युवकाने तिच्या डोळ्यात खिळा घालून फोडल्याची घटना येथे घडली असून, युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कतीहार येथे राहणारी 13 वर्षीय मुलगी आपल्या आजोबांना भेटण्यासाठी पोखारिया या गावात आली होती. गावातील गेनू शर्मा (वय 22) या युवकाने सोमवारी (ता. 6) संध्याकाळी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करत असताना गेनूने तिच्या डाव्या डोळ्यात खिळा घातला. रक्ताबंबाळा अवस्थेत तिने घर गाठले. उपचारासाठी तिला जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेनूच्या विरोधात तक्रार दाखल झाली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.'

रुग्णालयाचे अधिकक्ष डॉ. राम छरित्र मंडल यांनी सांगितले की, 'पीडित मुलीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाल्यामुळे तो निकामी होण्याची शक्यता आहे.'