अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

या प्रकरणातील आरोपी राकेश भार्गव याने पीडित मुलीचे अपहरण करून आपल्या साथीदारासह तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर पीडित मुलीला मारहाण करण्यात आली. त्यात तिच्या डोळ्याला जखम झाली

 

बिकानेर - राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण केल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी आज सांगितले.

24 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी राकेश भार्गव याने पीडित मुलीचे अपहरण करून आपल्या साथीदारासह तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर पीडित मुलीला मारहाण करण्यात आली. त्यात तिच्या डोळ्याला जखम झाली. जयपूरच्या रुग्णालयात पीडित मुलीला दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: minor girl gang raped