मिझोराममध्ये घरे कोसळली

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने "मोरा' चक्रीवादळ तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भुवनेश्‍वर : बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळ मिझोराममध्ये पोहोचले. मोरा वादळासह वादळी वारा व पावसामुळे मिझोराममधील अनेक घरे कोसळली. तसेच दरडी कोसळण्याचे प्रमाणही लक्षणीय होते. राज्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडली तर वीजही काही काळासाठी बंद होती.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने "मोरा' चक्रीवादळ तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, श्रीलंकेत आधीच पूरग्रस्त परिस्थिती असताना "मोरा'मुळे पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्‍यता निर्माण झाल्याने येथील प्रशासन आणि नागरिक चिंतेत आहेत.