आमदारांच्या निवृत्तिवेतनास कात्री; भगवंत मान

भगवंत मान सरकारचा निर्णय : आता केवळ एका मुदतीसाठीच पेन्शन
MLA pensions Bhagwant Mann Punjab aap
MLA pensions Bhagwant Mann Punjab aapEsakal

चंडीगड : पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ सरकारने माजी आमदारांना केवळ एकाच मुदतीसाठी (टर्म) निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी आमदारांना वेगवेगळ्या ‘टर्म’साठी वेगवेगळे निवृत्तिवेतन दिले जात होते. अनेक आमदार हे दोनदा, पाचदा तर काहीजण हे दहादा निवडून आले आहेत. आता त्या सगळ्यांना केवळ एकाच टर्मसाठी निवृत्तिवेतन देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री मान यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून केली आहे. पंजाबमधील अनेक खासदार हे याआधी आमदार देखील होते त्यांना देखील या निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळत होता.

यातून बचत झालेली रक्कम ही लोकांसाठी कल्याणासाठी खर्च करण्यात येईल, असे मान यांनी जाहीर केले. यावेळी बोलताना मान म्हणाले की, ‘‘ आमच्या पक्षाच्या नेत्यांनी लोकांसमोर हात जोडत आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या अशी विनंती करत मते मागितली होती. आपल्याच राज्यातील अनेक आमदार हे तीनदा, चारदा आणि पाचदा निवडून आलेले आहेत त्यातील काहीजण पुढे पराभूत झाले तर काहींना त्यांच्या पक्षानेच उमेदवारी द्यायला नकार दिला होता. या सगळ्यांवर लाखो रुपये निवृत्तिवेतनापोटी खर्च केले जात होते. काहींना साडेतीन लाख रुपये तर काहींना साडेचार तर अधिकवेळा निवडून आलेल्या माजी आमदारास सव्वापाच लाख रुपयांपर्यंतचे निवृत्तिवेतन दिले जात होते. यामुळे राज्याच्या तिजोरीवर देखील आर्थिक ताण येत होता.’’

आता एवढीच रक्कम मिळणार

आता माजी आमदारांना एका टर्मसाठी ७५ हजार रुपये एवढे निवृत्तिवेतन देण्यात येईल त्यानंतर प्रत्येकी एका टर्मसाठी ६६ टक्के याप्रमाणात निवृत्तिवेतन दिले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनी निवृत्तिवेतन न घेण्याची घोषणा केली होती. ते तब्बल अकरावेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com