मोदींना राष्ट्रवादाची व्याख्या करण्याचा अधिकार दिलेला नाही : काँग्रेस

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने देशविरोधाची केलेली व्याख्या कोणीही स्वीकारणार नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, संघ किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राष्ट्रवादाची व्याख्या करण्याचा अधिकार देशाने दिलेला नसल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्ये वाद सुरू आहेत. या बाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी "विद्यार्थ्यांमध्ये हिंसा ही सामान्य घटना आहे. मात्र, महाविद्यालये किंवा विद्यापीठांमध्ये देशविरोधी घोषणा देण्याचा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही', अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर भाजपवर निशाणा साधताना काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले, "भारत हा प्रजासत्ताक, लोकशाही असलेला बहुधर्मिय आणि बहुभाषिक देश आहे. प्रदीर्घ काळापासून ज्यांची भारतीय राज्यघटनेसोबतची बांधिलकी संशयास्पद आहे, त्यांनी दिलेले प्रमाणपत्र किंवा केलेली व्याख्या कोणीही स्वीकारणार नाही. अमित शहा, भारतीय जनता पक्ष किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना राष्ट्रवादाची व्याख्या करण्याचा देशाने अधिकार दिलेला नाही', अशी टीकाही शर्मा यांनी यावेळी केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालीद याला एका कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यावरून विद्यार्थी संघटनांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Modi dosen't have right to make definition of nationalism : Congress