मोदी सरकार असंवेदनशील: केजरीवाल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला नोटा बंदीचा निर्णय मागे घेण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला नोटा बंदीचा निर्णय मागे घेण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) ट्‌विटरद्वारे टीका केली आहे. 'निर्णय मागे घेण्याबाबतच्या मागणीचा किमान फेरआढावा घेण्यासही अर्थमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे नकार दिला आहे. मोदी सरकारचा नागरिकांसोबतचा संबंध संपला आहे आणि सरकार असंवेदनशील बनले आहे', अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याच्या निर्णयानंतर केजरीवाल यांनी या निर्णयावर विरोध दर्शविला आहे. विरोधी पक्षांनीही नोटाबंदीमागे मोठा गैरव्यवहार असल्याचे म्हणत या निर्णयाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूबद्दल केलेल्या विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी आज लोकसभा आणि राज्यसभेत करण्यात आली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

देश

नवी दिल्ली - "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाची सत्ता हाती येईपर्यंत कधीच...

02.00 PM

मुंबई : मला मुलाला जन्म घालण्याची कोणतीही हौस नाही. पण, आता मुलीला जन्म देताना भीती वाटते, अशी खळबळजनक याचना टीव्ही अभिनेत्री...

01.30 PM

पलक्कड : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते...

12.09 PM