'मोदीजी देशाला पाकविरुद्ध युद्धासाठी तयार करा!'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरे सोडून देशाला पाकिस्तानविरुद्धच्या युद्धासाठी तयार करावे, असा सल्ला स्वामी स्वरुपानंद सरस्वी यांनी दिला आहे.

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरे सोडून देशाला पाकिस्तानविरुद्धच्या युद्धासाठी तयार करावे, असा सल्ला स्वामी स्वरुपानंद सरस्वी यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वरुपानंद म्हणाले, "पाकिस्तानबाबत आणि परराष्ट्र धोरणांमध्ये कॉंग्रेसच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या मोदी सुधारतील अशी आशा होती. मात्र आता असे वाटत आहे की मोदी यांची विदेश नीतीही निराधार आहे असे वाटत आहे.‘ तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चीनसोबत पंचशील कराराच्या वेळी केलेल्या चुका मोदी पुन्हा करत असल्याचेही ते पुढे म्हणाले. उत्तर काश्‍मीरमधील उरी शहरात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले.

या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सरकारने सावध पवित्रा घेत या प्रकरणी तारतम्याने आणि तोलूनमापूनच आगामी कृती केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

देश

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्याची राजधानी असलेल्या श्रीनगर येथे एका पोलिस...

शुक्रवार, 23 जून 2017

नवी दिल्ली - वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी केंद्र स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट परिक्षेचा आज (शुक्रवार) निकाल जाहीर...

शुक्रवार, 23 जून 2017

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे...

शुक्रवार, 23 जून 2017