मोदींचा दसरा मेळावा होता दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

नवी दिल्ली: उज्जैन रेल्वे स्फोटात कथितरित्या समावेश असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखनौ येथे झालेल्या दसरा मेळाव्यातही स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरला होता.

राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) चौकशी अहवालानुसार, इसिस या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाने संशयित दहशतवाद्यांनी रामलीला मैदानात बॉंब ठेवण्याची योजना आखली होती. या मैदानावर पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी 17 ऑक्‍टोबरला एका मेळाव्यात भाषण केले होते. अटक केलेल्या संशयित मोहम्मद दानिश आणि आतिफ मुज्जफर यांच्याकडून एनआयएच्या चौकशीत ही माहिती समोर आली. हे दोन्ही दहशतवादी सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत.

Web Title: Modi was the target of terrorist Dussehra rally