मोदी 11 मे पासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर

पीटीआय
सोमवार, 8 मे 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याला 11 मे पासून सुरवात होणार आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यात मोदी हे वेसाक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याला 11 मे पासून सुरवात होणार आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यात मोदी हे वेसाक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त कोलंबोमध्ये 12 ते 14 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचाही समावेश आहे. या परिषदेला शंभर देशांतील सुमारे चारशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. वेसाक हा बौद्ध कालगणनेतील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो.

मोदींचा हा श्रीलंकेचा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात मोदी कॅंडीलाही भेट देणार आहेत. या ठिकाणी मोदी हे चहाच्या मळ्यांमधील कामगारांना संबोधित करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Modi will on Shrilanka tour from 11 May