'मोदीजी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाका पण...'

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : "मोदीजी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना ताब्यात घ्या; मात्र देशाच्या सैनिकांना न्याय द्या' असे म्हणत कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : "मोदीजी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना ताब्यात घ्या; मात्र देशाच्या सैनिकांना न्याय द्या' असे म्हणत कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या "वन रॅंक वन पेन्शन' प्रकरणी नाराज असलेले (ओआरओपी) माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल हे सोमवारपासून आपल्या काही सहकाऱ्यांसोबत दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोनल करत होते. दरम्यान मंगळवारी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटण्यासाठी जाणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी विष पिऊन आतमहत्या केली. राहुल गांधी हे आज (बुधवार) राम किशन यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना मध्येच रोखले. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले, "राहुल गांधी यांना सध्या दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस स्थानकात ठेवण्यात आले आहे. मोदीजी यांनी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना ताब्यात घ्यावे, मात्र त्यांनी देशाच्या सैनिकांना न्याय द्यावा. त्याबाबत आम्हाला मोदीजींना विचारावेसे वाटते की त्यांनी काय केवळ मतांसाठी ओरआरओपीचा मुद्दा काढला आहे?'

राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्री शीला दीक्षित, ज्योतिरादित्य शिंदे, अजय माकनही टिळक मार्ग पोलिस स्थानकात हजर आहेत. दरम्यान राम किशन यांच्या कुटुंबियांना भेटायला निघालेले दिल्लीचे मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना आज दुपारपासून संसद मार्ग पोलिस स्थानकात ठेवण्यात आले आहे.

Web Title: 'Modiji arrest all Congress leaders, but...'