मोदीजी तातडीने 15 लाख जमा करा: दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने "लक्ष्मीने सर्वांचे भांडार भरून ठेवावे आणि मोदीजींनी तातडीने 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करावेत', असे म्हणत कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी "दिवाळीच्या शुभेच्छांनी माझा इनबॉक्‍स (ई-मेल इनबॉक्‍स) भरून गेला आहे. त्यामुळे मी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद देतो. क्षमा करावी', असे म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदींवर निशाणा साधत "लक्ष्मीने सर्वांचे भांडार भरून ठेवावे आणि मोदीजींनी प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये तातडीने जमा करावेत', असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्‌विटरद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा!', असे म्हणत राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Modiji give Rs. 15 lacs - Digvijaysingh