मोदींमुळेच काश्‍मीरात दहशतवाद्यांना मोकळीक : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

मोदी यांच्या धोरणामुळे काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांना मोकळीक मिळाल्याचे मत व्यक्‍त केले आहे. याचबरोबर, राजकीय लाभासाठी काश्‍मीरात झालेल्या भाजप-पीडीपी युतीमुळेही भारताचे मोठे नुकसान झाल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

हा हल्ला म्हणजे भारतासाठी मोठा धक्का असल्याची टीका करत राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणामुळे काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांना मोकळीक मिळाल्याचे मत व्यक्‍त केले आहे. याचबरोबर, राजकीय लाभासाठी काश्‍मीरात झालेल्या भाजप-पीडीपी युतीमुळेही भारताचे मोठे नुकसान झाल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. 

अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी पळून जाऊ लागले. पळून जाताना त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्याच वेळी अमनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या यात्रेकरूंची एक बस त्या भागात आली. दहशतवाद्यांनी त्या बसवरही बेछूट गोळीबार केला. 

अमरनाथ यात्रेदरम्यान अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी लक्ष्य बनविलेल्या बसचा चालक सलीम शेख बसमधील सुमारे 50 भाविकांचा जीव वाचविल्याने हिरो ठरला आहे. मात्र, सात जणांचा जीव वाचवू न शकल्याची खंत त्याला आहे. 

       ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :