शहाबुद्दीनची तिहार कारागृहात रवानगी

वृत्तसंस्था
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

बिहारच्या सिवान तुरुंगातून शुक्रवारी मध्यरात्री त्याला पाटण्यातील बेऊर कारागृहात आणण्यात आले होते. आज तेथून त्याची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात करण्यात आली. संपूर्ण क्रांती एक्स्प्रेसने त्याला दिल्लीला आणण्यात आले.

नवी दिल्ली - राजदचा वादग्रस्त नेता मोहंमद शहाबुद्दीनची याची आज (रविवार) पहाटे बेऊर तुरुंगातून दिल्लीतील तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली. कडक बंदोबस्तात शहाबुद्दीनला रेल्वेने दिल्लीला नेण्यात आले. 

बिहारच्या सिवान तुरुंगातून शुक्रवारी मध्यरात्री त्याला पाटण्यातील बेऊर कारागृहात आणण्यात आले होते. आज तेथून त्याची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात करण्यात आली. संपूर्ण क्रांती एक्स्प्रेसने त्याला दिल्लीला आणण्यात आले. तिहारमधील जेल नंबर 2 मध्ये त्याला ठेवण्यात येणार आहे. 

शहाबुद्दीनची एक आठवड्यात तिहार तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. बिहारबाहेर स्थलांतरित केल्याने शहाबुद्दीनच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी निष्पक्षपणे होईल अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. शहाबुद्दीनला कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक देऊ नये, असेही निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री त्याला पाटण्यात आणण्यात आले आहे. सध्या तो बेऊर कारागृहात असून, त्यानंतर त्याला तिहारला नेण्यात येणार आहे. 

न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश अमिताव रॉय यांच्या पीठाने सरकारला शहाबुद्दीनला एका आठवड्यात तिहार तुरुंगात आणण्याचे निर्देश दिले होते. शहाबुद्दीनच्या विरोधात असलेल्या खटल्यांची सुनावणी तुरुंगातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. सिवानचे चंद्रकेश्‍वर प्रसाद आणि आशा रंजन यांनी राजदच्या नेत्यास सिवान तुरुंगातून हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. प्रसाद यांचे तीन मुले दोन वेगवेगळ्या घटनेत मारले गेले आणि आशा यांचे पती राजदेव रंजन यांची सिवान येथे हत्या करण्यात आली होती. या घटनेमागे शहाबुद्दीन मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Mohammad Shahabuddin shifted to Delhi's Tihar Jail