राष्ट्रपतिपद स्वीकारणार नाही- मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये जी चर्चा सुरू आहे, ती केवळ चर्चाच ठरणार आहे, असे स्पष्ट करीत राष्ट्रपतिपदासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला. संघात आलो तेव्हाच राजकीय पदाचे दरवाजे बंद केले. राष्ट्रपतिपदाचा प्रस्ताव आला तरी तो स्वीकारणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. या संदर्भात त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. रा. स्व. संघातर्फेही कोणतेही पत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते, त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबद्दल संभ्रम कायम होता. नागपुरात आज एका कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी स्पष्टीकरण देऊन या चर्चेला विराम दिला. ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, ""राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करीत असताना राजकीय गोष्टींकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असल्याची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. या चर्चांकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहावे. त्यामुळे आता आपण राष्ट्रपतिपदाचा प्रस्ताव आला तरी तो स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिद्धीतून मोठे होण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यातून मोठे होण्यातच खरा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.