केवळ नोटाबंदीने काळा पैसा येणार नाही - नितीशकुमार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले, मात्र केवळ नोटाबंदीने काळा पैशाला लगाम बसणार नाही, हे स्पष्ट केले. देशातील दोन नंबरचे काम बंद झाले, तरच देशातील काळा पैसा थांबेल, असे नितीशकुमार म्हणाले.

दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना नितीशकुमार म्हणाले, की पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र केंद्र सरकारने आता बेहिशेबी संपत्ती गोळा करणाऱ्यांवरदेखील कारवाई करायला हवी. पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे समर्थन करतो, कारण मी चांगल्या निर्णयावर विश्‍वास ठेवतो. महाआघाडीसंदर्भात बोलताना नितीशकुमार म्हणाले, की पाच वर्षांपर्यंत राज्यातील महाआघाडी चालेल. बिहारच्या परिस्थितीनुसार महाआघाडीची स्थापना झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकारकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करताना देशात दारूबंदी लागू करण्याची हिंमत पंतप्रधानांनी दाखवावी, असेही आवाहन नितीशकुमार यांनी केले.