ओडिशा: मोदींच्या दौऱ्याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांचा रेल्वे स्थानकावर हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

मोदींच्या या दौऱ्याचा निषेध करत नक्षलवाद्यांनी रायगडा जिल्ह्यातील डोईकल्लू रेल्वे स्थानकावर आज सकाळी मोठा हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन स्फोट घडवून आणले आणि स्थानकावरील दोन वॉकी-टॉकी पळवून नेल्या. नक्षलवाद्यांनी स्थानकावर मोदींचा निषेध करणारे पोस्टर्सही लावले आहेत.

डोईकल्लू (ओडिशा) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओडिशा दौऱ्याचा निषेध करत तीस नक्षलवाद्यांनी आज (शुक्रवार) सकाळी रायगडा जिल्ह्यातील डोईकल्लू रेल्वे स्थानकावर मोठा हल्ला केला.

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची येत्या 15 एप्रिल रोजी ओडिशामध्ये दोन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मोदींच्या या दौऱ्याचा निषेध करत नक्षलवाद्यांनी रायगडा जिल्ह्यातील डोईकल्लू रेल्वे स्थानकावर आज सकाळी मोठा हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन स्फोट घडवून आणले आणि स्थानकावरील दोन वॉकी-टॉकी पळवून नेल्या. नक्षलवाद्यांनी स्थानकावर मोदींचा निषेध करणारे पोस्टर्सही लावले आहेत.

मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, "पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व पाठिंबा दिल्याबद्दल ओडिशातील जनतेचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान ओडिशामध्ये येत आहेत.'

Web Title: More than 30 naxals attacked Doikallu Rly Station