आणखी 11 सार्वजनिक कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

नवी दिल्ली : सुमार कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक उपक्रम आणि कंपन्यांतील हिस्सा विक्री करून निधी उभारण्याचा प्रस्ताव निती आयोगाने अर्थ खात्यासमोर मांडला आहे. निर्गुंतवणुकीसाठी जवळपास 50 कंपन्यांची यादी निती आयोगाने सादर केली आहे. त्यापैकी किमान 11 कंपन्यांतील हिस्सा विक्रीवर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

दिल्लीतील "अशोक हॉटेल', "एमटीएनएल'चा मनोरा व्यवसाय, "भारत हेवी इलेक्‍ट्रीकल्स' आदी कंपन्यांतील हिस्सा विक्री केली जाणार आहे.

निती आयोगाच्या प्रस्तावावर अभ्यास करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अर्थ खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एअर इंडियाच्या हिस्सा विक्रीला प्रतिसाद न मिळाल्याने सरकारची अडचण झाली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांतील हिस्साविक्री करून निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे.

तोट्यातील भारत संचार निगम लिमिटेडबाबत (बीएसएनएल) निती आयोगाने कृती आराखडा सादर केला. एमटीएनएलच्या मनोरा व्यवसायातील हिस्सेदारी विक्री करण्याचे सूचित केले आहे.

Web Title: More PSUs to undergo disinvestment process in India