आणखी सर्जिकल हल्ले शक्‍य - बिपीन रावत

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

पाकव्याप्त काश्‍मीर किंवा सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ असल्याची माहिती मिळाली व दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या. तर अशा प्रकारचे हल्ले करण्याचा भारताला पूर्णपणे अधिकार आहे

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून आणखी "सर्जिकल हल्ले' करणे शक्‍य असून, तसा भारताला अधिकार आहे. भविष्यात गरज पडल्यास अशा प्रकारचे हल्ले करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे प्रतिपादन नवनियुक्त जनरल बिपीन रावत यांनी आज केले.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. रावत म्हणाले, ""पाकव्याप्त काश्‍मीर किंवा सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ असल्याची माहिती मिळाली व दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या. तर अशा प्रकारचे हल्ले करण्याचा भारताला पूर्णपणे अधिकार आहे.'' भारताने 29 नोव्हेंबर 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्याचे अत्यंत चांगल्याप्रकारे नियोजन केले होते. योग्य तयारी केल्याने हा हल्ला यशस्वी ठरला आणि त्याचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना जाते. जवानांना कोणता धोका पोचणार नाही. याची काळजी घेत या हल्ल्याचे नियंत्रण करण्यात आले होते, अशी माहिती रावत यांनी दिली.

रावत त्या वेळी स्वतः लष्कराचे उपप्रमुख या नात्याने या मोहिमेवर नजर ठेवून होते.

आपली नियुक्ती पारदर्शक
लष्करप्रमुख पदावर झालेल्या रावत यांच्या नियुक्तीवरून कॉंग्रेसने भाजपवर टीका केली होती. याविषयी बोलताना रावत म्हणाले, ""सरकारने घेतलेला निर्णय हा पारदर्शी असून, तो कोणाच्या प्रभावाखाली घेण्यात आलेला नाही. जर तसे शक्‍य असते, तर कोणीही दबाव किंवा प्रभाव टाकून आपल्या इच्छेनुसार हव्या त्या पदावर नियुक्ती करून घेतली असती.''

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

10.33 PM

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

09.21 PM

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

05.00 PM