भारतात प्रामाणिक नेता होणे अवघड: राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

भारतात प्रामाणिक नेता होणे कठीण काम असून, प्रामाणिक नेत्याला खूप भोगावे लागते. याचा मला अनुभव आहे. भारताचे राजकारण तलावाप्रमाणे आहे, त्याला बदलून नदी बनविण्याची गरज आहे.

राजकोट : भारतात सध्या प्रामाणिक नेता होणे अवघड असून, त्याचा मला चांगलाच अनुभव आहे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रात्री जनतेला संबोधित करताना सध्याच्या परिस्थितीविषयी भाष्य केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवरही जोरदार टीका केली. नोटाबंदी व जीएसटीवरून मोदींना लक्ष्य केले. मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर काही वेळातच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नोटाबंदीचा हा निर्णय म्हणजे ‘गुन्हेगारी कृत्य’ असल्याचे म्हटले होते, अशी आठवण राहुल यांनी या वेळी करून दिली. 

राहुल गांधी म्हणाले, की भारतात प्रामाणिक नेता होणे कठीण काम असून, प्रामाणिक नेत्याला खूप भोगावे लागते. याचा मला अनुभव आहे. भारताचे राजकारण तलावाप्रमाणे आहे, त्याला बदलून नदी बनविण्याची गरज आहे. मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्याचे वचन दिले होते. पण त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही. रोजगार हा छोट्या, मध्यम क्षेत्रातील उद्योगातून येतो. पण या सरकारचे केवळ ५-१० औद्योगिक घराण्यांकडेच लक्ष आहे.