चित्रपटातील महिलांच्या प्रतिमेबद्दल मनेका गांधींची नाराजी

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

चित्रपटातून दाखविण्यात येणाऱ्या महिलांच्या प्रतिमेबद्दल केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी नाराजी व्यक्त केली आहे. "बहुतेक चित्रपटांतील प्रणयाची सुरूवात ही छेडछाडीने होते', असे म्हणत त्यांनी चित्रपटातून महिलांची प्रतिमा चांगल्या पद्धतीने दाखविण्यात यावी, असे आवाहन केले.

पणजी - चित्रपटातून दाखविण्यात येणाऱ्या महिलांच्या प्रतिमेबद्दल केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी नाराजी व्यक्त केली आहे. "बहुतेक चित्रपटांतील प्रणयाची सुरूवात ही छेडछाडीने होते', असे म्हणत त्यांनी चित्रपटातून महिलांची प्रतिमा चांगल्या पद्धतीने दाखविण्यात यावी, असे आवाहन केले.

गोवा फेस्टिव्हलमध्ये जाहिरात आणि माध्यमांसंदर्भातील कार्यक्रमात गांधी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "हिंदी किंवा प्रादेशिक भाषेतील बहुतांश चित्रपटांमध्ये प्रणयाला (रोमान्स) छेडछाडीनेच सुरूवात होते. एक व्यक्ती आणि त्याचे मित्र महिलेभोवती गोळा होतात, तिला कमी लेखतात, तिचा छळ करतात, असभ्यपणे तिला स्पर्श करतात आणि त्यानंतर ती हळूहळू त्या व्यक्तीच्या प्रेमात पडते.' चित्रपटांतील अशा प्रकारांमुळे पुरुषांना प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपट आणि जाहिरात संस्थांनी महिलेची चांगली प्रतिमा दाखवावी, असे आवाहनही गांधी यांनी यावेळी केले.