लखनौ चकमकीत इसिसचा दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

रेल्वेतील स्फोट इसिसकडूनच - शिवराजसिंह चौहान
भोपाळ-उज्जैन रेल्वेत मंगळवारी झालेला स्फोट हा इसिस या दहशतवादी संघटनेच केल्याचा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. दहशतवाद्यांनी रेल्वेत बॉम्ब ठेवल्याची छायाचित्रे सीरियाला पाठविली आहेत.

लखनौ - भोपाळ-उज्जैन पॅसेंजरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई करत असताना काकोरी येथील चकमकीत घरात लपलेला इसिस या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मारला गेला. 

मृत दहशतवाद्याचे नाव सैफुल असे आहे. त्याच्याजवळ इसिसचा झेंडा, स्फोटके व अन्य शस्त्रास्त्रे सापडली आहेत. तसेच काही रेल्वे गा़ड्यांचे वेळापत्रकही सापडले आहे. मंगळवारी सकाळी भोपाळ उज्जैन पॅसेंजरवर दहशतवादी हल्ला झाला होता. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. हा स्फोट म्हणजे घातपाताचीच घटना असल्याचे मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्रसिंह ठाकूर यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पिपरियातून तिघांना ताब्यात घेतले असून, कानपूरमधून एकाला अटक केली आहे. 

या स्फोटाशी संबंध असलेला "इसिस'शी निगडित दहशतवादी लखनौ पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. हा संशयित काकोरीतील एका घरात दडला होता. हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या घराजवळच्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यास प्रारंभ केला. सैफुल याला शरण येण्याचे आवाहन करूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. वीस कमांडोंनी घराला वेढा घातल्यानंतर चकमक सुरू झाली. ही चकमक सुमारे चार तास सुरू होती. पॅसेंजरमधील स्फोट ही दहशतवादी घटना असल्याची माहिती मिळाल्यानुसार ही कारवाई सुरू केल्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) दलजित चौधरी यांनी सांगितले.

रेल्वेतील स्फोट इसिसकडूनच - शिवराजसिंह चौहान
भोपाळ-उज्जैन रेल्वेत मंगळवारी झालेला स्फोट हा इसिस या दहशतवादी संघटनेच केल्याचा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. दहशतवाद्यांनी रेल्वेत बॉम्ब ठेवल्याची छायाचित्रे सीरियाला पाठविली आहेत.

Web Title: mp train blast an isis terrorist attack